विरोधी पक्षांचे १७ आमदार भाजप प्रवेशासाठी रांगेत – रावसाहेब दानवे

0
436

जालना,  दि. २७ (पीसीबी) – भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विरोधी पक्षांचे १७  आमदार सध्या आमच्याकडे  रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,  असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केला आहे.  यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दानवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,   विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह  राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते.  यावरून काय ते समजा, असेही ते म्हणाले.

राज्यातील विधानसभा निवडणूक भाजप-सेना एकत्र लढणार आहे. जागावाटपाचा फार्म्युला ठरलेला आहे. तिकिटे जाहीर झाली की सगळ्यांना कळेल, असे ते म्हणाले.  जालना शहरातील महा जनादेश यात्रेसाठी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा  उपस्थित राहणार आहेत,  अशी माहिती त्यांनी दिली.