अटकपूर्व जामिनासाठी अजित पवारांचे प्रयत्न; शिवस्वराज्य यात्रेत अनुपस्थित राहणार

0
445

 मुंबई, दि. २७ (पीसीबी) – शिखर बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आपली अटक टाळण्यासाठी अजित पवारांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे ते इंदारपूरमधील शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार आहेत. अटकपूर्ण जामीन मिळावा, यासाठी अजित पवार हे सध्या मुंबईत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतर पवार यांनी या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिले होते. ‘कोर्टाने ७५ लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नाही. ७५ लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयाचा सुध्दा दागीलदार नाही हे जाहीर भाषणात सांगतो,’ असे म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.