विरेंद्र सेहवाग का भडकला भारतीय फलंदाजांवर

0
659

मुंबई, दि २८ (पीसीबी) – भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडलेल्या ३४ व्या सामन्यात भारताने १२५ नी दणदणीत विजय मिळवला आहे. फलंदाज धोनी, विराट व पंड्याच्या फिरकी गोलंदाजी खेळीवरून विरेंद्र सेहवागने ट्विट करत भारतीय फलंदाजांवर टीका केली आहे. सेहवागने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘राशिद खानने पहिल्या ४ षटकात २५ धावा दिल्या. तर नंतरच्या ६ षटकात केवळ १३ धावा दिल्या आणि आज फॅबियन ऍलेनने पहिल्या ५ षटकात ३४ धावा दिल्या. त्यानंतरच्या ५ षटकात फक्त १८ धावा दिल्या. फिरकीपटूंविरुद्ध एवढे बचावात्मक खेळू शकत नाही.’

भारतीय फलंदाज हे नेहमी फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगल्या खेळासाठी ओळखले जातात. परंतु अफगाणिस्तान आणि विंडीज विरुद्ध भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी ज्याप्रकारे खेळले त्याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विट करत टीका केली आहे. दरम्यान भारतीय फलंदाजांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही टीका केली होती. तसेच या सामन्यातही भारतीय फलंदाज ज्याप्रकारे फिरकी गोलंदाजी खेळले त्यावरही सचिनने नाराजी व्यक्त केली होती.