विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत गृहअतिक्रमण; चौघांवर गुन्हा दाखल

0
368

मोशी, दि. १९ (पीसीबी) – विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चार जणांनी एका व्यक्तीच्या घरात जबरदस्तीने गृह अतिक्रमण केले. ही घटना दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी येथे घडली.

विकास महादू दरवडे, पांडुरंग महादू दरवडे, दोन महिला (सर्व रा. दौंदे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रावसाहेब पांडुरंग साळुंके (वय २८, रा. दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना जबरदस्तीने घराच्या बाहेर काढण्याची पूर्वतयारी करून आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.