पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून भर रस्त्यात तरुणीला शिवीगाळ करत मारण्याची धमकी

0
295

सांगवी, दि. १९ (पीसीबी) – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने तरुणीला भर रस्त्यात कोयता घेऊन येत शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. १७) रात्री आठ वाजता सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडली.

रवी भोकटे (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुचिता संतोष झावरे (वय २०, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्या कारणावरून मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी कोयता घेऊन दुचाकीवरून आला. भर रस्त्यात त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत ‘तुला आता मारल्याशिवाय राहणार नाही. तुला कुठे जायचे तिथे जा’ अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्या आईला देखील शिवीगाळ केली. फिर्यादी पुन्हा आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपीने पुन्हा फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.