विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतायं, मग ही कागदपत्रे आवश्यक आहेत

0
2173

मुंबई, दि.२१ (पीसीबी) –  सप्टेबरला निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २७ सप्टेबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारास २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालण्यात आली आहे. तर ५ ऑक्टोबरला छाननी केली जाणार आहे .

उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उमेदवारांची खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१.  उमेदवारी अर्ज

२. प्रतिज्ञापत्र नमुना २६

३. अनामत रक्कम भरलेली पावती मूळप्रत

४. राजकीय व नोंदणीकृत पक्षाचा उमेदवार असल्याच ए.बी फॉर्म

५. मतदारयादी भागाची प्रमाणित प्रत, संबंधित निवडणूक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र

६. शपथपत्र नमुना १४, ७ व लागू असल्यास अनुसिचीत जातीचे प्रमाणपत्र

७ . निवडणूक खर्चासाठी नवीन बँक खाते क्रमांक व पासबुक झेरॉक्स

८ . दोन स्टॅप साईज व दोन पांढरे बॅकग्राउंड असलेले रंगीत पासपोर्ट साईज फोटो.

९. सादर केलेल्या फोटोबाबत केलेले घोषणापत्र

१०. उमेदवार व प्रतिनिधीच्या माहितीचा तपशील

११. उमेदवाराच्या सहीचा नमुना

१२. उमेदवार प्रतिनिधी नियुक्तीचा नमुना

१३. वयाचा दाखला

१४. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे इतर आवश्यक सर्व कागदपत्रे