स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का; प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांचा राजीनामा

0
527

मुंबई, दि. २७ (पीसीबी)-  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तासभर चर्चा केली. त्यामुळे तुपकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली. तुपकर यांनी राजीनामा दिल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी चळवळीमध्ये आजपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. त्यांच्या भावी वाटचालीस स्वाभिमानी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

तुपकर हे राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेनेला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीपासून काडीमोड घेतल्यानंतर तुपकर यांचे पक्षात वजन वाढले होते.