विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत मनसेचा मोठा निर्णय

0
766

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – मनसेने लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकही न लढवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.        

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी  बैठक बोलावून पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. या बैठकीत  लोकसभेप्रमाणेच विधानसभाही न लढण्याचा  सूर  अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी आळवला.

स्वतःकडचे पैसे जपून वापरा.  देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.  देशाच्या कठीण आर्थिक परिस्थितीत निवडणूक लढवणेही कठीण असल्याचे सूचक  विधान  राज ठाकरे यांनी  या बैठकीत केल्याची माहिती मिळत  आहे.

राज ठाकरे यांच्या  या मताला  मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील   अनुकुलता  दाखवून त्यांच्या सुरात सुरात मिसळला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पक्षाकडून आर्थिक पाठबळ मिळणे कठीण असल्यानेच निवडणूक लढविण्यात येऊ नये, असे एकमत या बैठकीत झाल्याचे सांगितले जात आहे.