विदर्भात काँग्रेसला धक्का; माजी मंत्री सतीश चतुर्वेदींच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश  

0
419

मुंबई, दि. २३ (पीसीबी) –  नागपूरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज (रविवार) शिवसेनेत प्रवेश केला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्यंत यांच्या हातात शिवबंधन बांधले. दुष्यंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सतीश चतुर्वेदी हे विदर्भातील काँग्रेस एक वजनदार नेते मानले जातात. २५ वर्ष आमदार आणि १० वर्ष कॅबिनेट मंत्री असल्याने सतीष चतुर्वेदी यांचा विदर्भात मोठा जनसंपर्क आहे. तर दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य आहेत. तसेच लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि संचालकही आहेत.

दुष्यंत चतुर्वेदी यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची विदर्भात ताकद वाढणार आहे. सतीश चतुर्वेदी यांचा जनतेशी चांगला संपर्क आहे. त्यांची संघटनात्मक ताकद जास्त आहे.  त्यामुळे माजी मंत्र्याच्या मुलाला पक्षात घेऊन शिवसेनेने विदर्भात  भाजपला शह देण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.  शिवसेनेला  विदर्भात चांगला विस्तार करता येणार आहे.