विठ्ठलनगरमध्ये व्हॅलेंटाईन डे ला विष केले म्हणून महिलेचा विनयभंग

0
790

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – “व्हॅलेंटाईन डे ला विष का केलेस”, असे म्हणून एका इसमाने ३६ वर्षीय महिलेसोबत भररसत्यात अश्लिल चाळे करुन विनयभंग केला. ही धक्कादायक घटना १७ फेब्रुवारी ते २० मे दरम्यान अंगणवाडी ४२ आणि ४३ समोर विठ्ठलनगर पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी पिडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रमेश दादाराव साळवे (वय ५०, रा. फ्लॅट क्र. ११३, बि ३, जीवन हौसिंग सोसायटी विठ्ठलनगर, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आरोपी रमेश याला व्हॅलेंटाईन डे ला विष केले होते. यावर रमेश याने १७ फेब्रुवारी ते २० मे या दरम्यान, “तु माला व्हॅलेंटाईन डे ला विष का केलेस”, असे बोलून भररस्त्यात अश्लिल चाळे केले आणि विनयभंग केला. यानंतर महिलेने रमेश याचा विरोध केला असता “मी तुला सोडणार नाही”, अशी धमकी रमेश याने पिडित महिलेला दिली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी रमेश याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डोलारे करत आहेत.