विठ्ठलनगरमध्ये नागरिकांना आली अवाजवी घरपट्टी

0
169

पिंपरी, दि.२९, (पीसीबी) : विठ्ठलनगरमध्ये नागरिकांना अवाजवी घरपट्टी आलेली आहे,कोरोना काळात लोकांचे रोजगार बुडाल्याने सध्या जीवन जगणे मुश्किल झाले असताना सरसकट ४६००० हजारांपर्यंत नागरिकांना घरपट्टी आकारली गेली आहे,या विरोधात व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता घरपट्टी सरसकट माफ करुन नागरिकांना दिलासा दयावा या मागणीसाठी विठ्ठलनगर येथील राहुलभाऊ भोसले युवामंचाच्या वतीने मा.आयुक्त साहेब,मा.क्षेत्रीय आधिकारी “क”प्रभाग,मा.प्रशासन व मंडलाधिकारी करसंकलन विभाग या आधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,यावेळी ज्ञानोबा धावारे,अशोक देवकर,किशोर गवळी,संजय जाधव,दत्ता जाधव,बापू सावंत,विनोद गायकवाड,स्नेहलता पाटोळे,सुनिता पाटोळे,संतोष खुडे,आतिष पाटोळे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.