विजय मल्ल्याकडून सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन

0
1053

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – मध्य प्रदेश, आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून दिल्याबद्दल मद्यसम्राट विजय मल्ल्या यांने काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि  ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

परदेशात राहणाऱ्या सेलिब्रिटिनीही काँग्रेस नेतृत्त्वाचे कौतुक केले आहे. तर ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्यानेही  अभिनंदन केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. मल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून सचिन पायटल आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे अभिनंदन केले. हे दोघेही काँग्रेसचे यंग चॅम्पियन्स असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसला सत्तेत आणण्यात  सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या दोघांनी  राज्यातील विविध भागांत मतदारांच्या भेटीगाठी घेऊन राज्यातील सरकारविरोधात वातावरण तयार केले होते. शेतकऱ्यांच्या रोषाचा  निवडणुकीत परिणामकारक वापर करून घेण्यात या दोघांना यश आले आहे.