विजयसिंह मोहिते पाटलांच्या सत्काराचा मला मान मिळाला, हे माझे भाग्यच – मोदी

0
660

अकलूज, दि. १७ (पीसीबी) – ज्येष्ठ नेते  विजयसिंह मोहिते पाटील यांची  ५० वर्षाची राजकीय  कारकीर्द आहे.  त्यामुळे  विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझे भाग्य  समजतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर  स्तुतीसुमने उधळली आहेत. 

विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केला आहे. त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या  व्यासपीठावर आले होते. अकलूज येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या व्यासपीठांवर मोहिते पाटील यांचा सत्कार मोदींच्या हस्ते करण्यात आला.

मोदी म्हणाले की, विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करणे हे माझे भाग्य आहे. मी स्वतःला भाग्यशाली समजतो.  सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेले असो, त्यांचे काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दिर्घाआयु ष्य लाभो आणि त्यांना  देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखी शक्ती लाभो, अशी कामना  मोदी यांनी  यावेळी केली.