विजयने सिनेमाच्या सेटवरील ४०० जणांना गिफ्ट केल्या सोन्याच्या अंगठ्या

0
534

बंगळुरू, दि. १४ (पीसीबी)-  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय याचा बिगिल हा सिनेमा दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले. शुटिंगच्या शेवटच्या दिवशी विजयने या सिनेमाच्या सेटवर काम करणाऱ्या सर्व ४०० जणांच्या टीमला एक सुखद धक्का दिला. विजयने या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये सहभागी असलेल्या सेटवरील प्रत्येकाला सोन्याची अंगठी भेट दिली. या अंगठीवर सिनेमाचे नाव म्हणजे ‘Bigil’ असे लिहिलेले आहे.

विजयने अचानक दिलेल्या या भन्नाट भेटवस्तूमुळे अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर या अंगठीचा फोटो पोस्ट करत विजयचे आभार मानले. याआधी विजयने या सिनेमामधील एका दृष्यासाठी फुलबॉलपटू म्हणून सेटवर आलेल्यांना फुटबॉल सही करुन भेट म्हणून दिले होते.

विजयने दिलेल्या सोन्याच्या अंगठीचा फोटो पोस्ट करताना एकजण म्हणतो, ‘सिनेमाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाच्या कामाचे कौतुक अशा पद्धतीने केले जाते म्हणून विजय खूपच खास आहे. हे असे करायला दिललदार आणि मोठ्या मनाचे असावे लागते.’