विकृतीचा कळस : दिराने वहिनीचा खून करुन केला बलात्कार

0
3708

नागपूर, दि. ३० (पीसीबी) – दिराने वहिनी आणि चार वर्षांच्या पुतणीचा खून केला. खूनानंतर त्या विकृताने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला.  ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास नागपूर येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी विकृत आरोपी दिर चंद्रशेखर बिंड (वय २६, रा. इंदोर ) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरात राहणारा चंद्रशेखर बिंड हा औषधांच्या दुकानात कामाला होता. तर त्याच्या नात्यातील भाऊ हा ट्रकचालक आहे. तो पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि वडिलांसह नागपूरमध्येच राहत होता. दोन दिवसांपूर्वी चंद्रशेखरचा भाऊ ट्रक घेऊन सातारा येथे गेला. तर त्याचे वडील गावी गेले होते. याचा फायदा घेत चंद्रशेखर बुधवारी दुपारी भावाच्या घरी गेला. भावाची पत्नी आणि चार वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. घरी गेल्यानंतर वहिनीने चंद्रशेखरला पाण्यासाठी विचारले. याचदरम्यान त्याने वहिनीची गळा आवळून खून केला. हा प्रकार चार वर्षांच्या मुलीनेही पाहिला होता. म्हणून त्याने चिमुरडीचाही खून केला. खून केल्यानंतर त्याने वहिनीच्या मृतदेहावर बलात्कार केला आणि पसार झाला.

संध्याकाळ झाली तरी घरातून आवाज येत नसल्याने स्थानिकांना संशय आला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उगडला असता हा प्रकार उघड आला पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदनात गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. तसेच मृतदेहावर बलात्कार झाल्याचेही उघड झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. आणि दिर चंद्रशेखर याला अटक केली. चंद्रशेखर याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.