वाद नकोत, विकासकामांवर बोलू; गिरीश महाजनांचे अजित पवारांच्या आव्हानाला उत्तर  

0
712

जळगाव, दि. २१ (पीसीबी) – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना बारामतीत येऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. मात्र, यावर त्यांनी आता नरमाईची भूमिका घेत वादाचे नकोत, आता राज्यात अनेक प्रश्न आहेत, विकासाच्या कामांवर बोलू, असे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.    

बारामतीत जावून निवडणूक लढविण्याचे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले होते. यावर अजित पवार यांनी महाजन बारामतीत याच दाखवतो तुम्हाला…!’ असे  प्रतिआव्हान दिले होते. तर राष्ट्रवादी काँगेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांनी महाजन आता निवडून येवून दाखवा, असेही आव्हान  दिले होते.

दरम्यान,  महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी  बोलताना अजित पवार यांना दिलेल्या आव्हानावर सावध भूमिका घेतली. महाजन म्हणाले आता ‘वादाचे विषय नको, राज्यातील विकासाची अनेक कामे करावयाची आहेत, असे स्पष्ट करून  त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.