वाकड पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले आणि चोरीला गेलेले २०१ मोबाईल तक्रारदारांना मिळाले परत

0
701

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – वाकड पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल २५ लाख रुपये किमतीचे २०१ मोबाई फोनचा वाकड पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करुन हे मोबाईल विविध राज्यातून प्राप्त करुन आज (गुरुवार) पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या हस्ते मुळ मालकांना परत केले.

बहुतांश वेळा गहाळ झालेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल आपल्याला पुन्हा मिळणारच नाही असा विचार करुन आपन तो मोबाईल परत प्राप्त करण्याची इच्छा सोडून देतो. मात्र वाकड पोलिसांनी हा विचार मोडित काडून वाकड पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले, गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले तब्बल २५ लाख रुपये किमतीचे २०१ मोबाईल देशातील विविध राज्यातून ट्रेस करुन हस्तगत केले. तसेच हे मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद मावेनासा झाला होता. तसेच त्यांनी पोलिसांचे अभार देखील मानले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपआयुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरिश माने तसेच पोलीस कर्मचारी डी.डी.सणस, बापुसाहेब धुमाळ, बिभीषन कन्हेरकर, नितीन ढोरजे, जावेद पठाण, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, विक्रम जगदाळे, भैरोबा यादव, शाम बाबा, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, दिपक भोसले, मधुकर चव्हाण, विक्रांत चव्हाण, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली.