“वाकड, पुनावळे, ताथवडेसाठी स्वतंत्र करसंकलन कार्यालय करा” – शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची आयुक्तांकडे मागणी

0
372

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – वाकड, ताथवडे, पुनावळे हे परिसर नव्याने विकसित होत आहेत.  येथील नागरिकांना करविषयक कामकाजासाठी थेरगाव करसंकलन कार्यालयाशी सतत संपर्क करावा लागतो. थेरगाव करसंकलन कार्यालयावरती एक लाखांपेक्षा जास्त मिळकातींचा भार असल्याने नागरिकांचे गैर सोय होत आहे. त्यामुळे वाकड, ताथवडे, पुनावळे साठी स्वतंत्र करसंकलन कार्यालय करावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात कलाटे म्हणतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव कर संकलन विभागीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामधील गट क्र.१ (कावेरी नगर ), गट क्र. ७ व ८ (वाकड), गट क्र.९ (पुनावळे) तसेच ताथवडे मधील सलग्न भाग ( गट क्र. १०,११ व १२) समाविष्ठ करून वाकड-ताथवडे पुनावळे किंवा भौगोलिक परस्थितिचा आढावा घेऊन येथील नागरिकांसाठी येथे स्वतंत्र करसंकलन विभागीय कार्यालय कार्यन्वित करणे आवश्यक आहे. वाकड-ताथवडे पुनावळे परिसरातील नागरिकांची तशी मागणी आहे. स्वतंत्र कर संकलन कार्यालय सुरु होण्याबाबत आयुक्त यांनी त्यांच्या स्तरावर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी.