वाकडमध्ये भरधाव पाण्याच्या टँकरने वृध्दाला चिरडले

0
584

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – भरधाव पाण्याच्या टँकरने चिरडल्याने एका वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२८) सकाळी पावणेआठच्या सुमारास वाकड येथील पोलारिस हॉस्पीटल समोर घडली.

विजय अमागल दास (वय ५७, रा. सदगुरु कॉलनी, वाकड) असे मयत वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी संजय लालु दास (वय २२, रा. सदगुरु कॉलनी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, (एमएच/१२/एचडी/६४७७) या क्रमांकाच्या पाण्याच्या टँकरवरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास वाकड येथील पोलारिस हॉस्पीटल समोरुन फिर्यादीचे दाजी विजय हे चालले होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या (एमएच/१२/एचडी/६४७७) या पाण्याच्या टँकरने विजय यांना चिरडले. यामुळे विजय यांचा जागीच मृत्यू झाला. तर टँकरचालक टँकरसह पसार झाला. वाकड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.