वाकडमधील बुद्ध विहारात माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी

0
1082

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भीम आर्मीच्या वतीने वाकड, म्हातोबानगर येथील बुद्ध विहारात माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम आर्मीचे शहर संघटक नितीन सरवदे होते. भीम आर्मीचे शहराध्यक्ष अंतिम जाधव यांनी माता रमाई यांच्या खडतर जीवनाविषयी माहिती दिली. सरचिटणीस भैय्य गजधने व उपाध्यक्ष सुमीत वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी अक्षय बनसोडे, अजय भंडारे, अक्षय ससाने, वनिता भंडारे, अनिता सरवदे, शालन जाधव, अनिकेत लोखंडे आदी उपस्थित होते. संघटक वैभव सावंत यांनी आभार मानले.