पिंपळेसौदागरमध्ये खगोलशास्त्रीय निरीक्षण उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
954

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) –ज्योतिविद्या परिसंस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपळेसौदार येथील छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन येथे ७५ तास खगोलशास्त्रीय निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत खगोलशास्त्राबद्दल खुली चर्चा आणि आकाशातील ग्रहांची पूर्ण माहिती देण्यात आली. पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्यभागी स्थित आहे. परंतु विविध संशोधनानंतर सूर्य सर्वग्रहांच्या मध्यभागी स्थिर असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती अभय यांनी दिली.

सारंग यांनी खगोलशास्त्राची माहिती दिली. पिंपळेसौदागरमधील अनेक लहान मुले, तरूण व ज्येष्ठ नागरिक या उपक्रमात सहभागी झाले. या सर्वांनी टेलिस्कोपने सनसेटची पाहणी केली. त्यांना आकाशातील विविध हालचाली खगोलशास्त्रीय उपकरणातून दाखवण्यात आली. पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनने या उपक्रमाचे संयोजन केले.