वडिलांच्या नावावरील व्यवसाय पतीच्या नावावर करण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
239

पिंपरी, दि. २ (पीसीबी) -वडिलांच्या नावावर असलेला व्यवसाय पतीच्या नावावर कर. तसेच माहेरहून 25 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला असल्याची फिर्यादी विवाहितेने पोलिसात दिली आहे. हा प्रकार सन 2017 पासून फेब्रुवारी 2020 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी आणि पुरंदर तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी घडला. याबाबत 1 ऑगस्ट रोजी फिर्याद देण्यात आली आहे.

पती अजिंक्य अशोक पोटे (वय 29), सासरे अशोक मोरेश्वर पोटे, सासू शकुंतला अशोक पोटे (वय 48, सर्व रा. संतनगर, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2017 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत आरोपींनी पिडीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या कालावधीत आरोपींनी फिर्यादी विवाहीतेकाकडे माहेरहून वेगवेगळ्या कारणांसाठी 25 लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेच्या वडिलांच्या नावावर असलेला व्यवसाय पतीच्या नावावर करण्याची मागणी केली. यावरून विवाहितेला धमकी देऊन शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.