लोहगावतील वाईन्स शॉप समोर तुफान गर्दी ; पोलिसी खाक्या दाखल्यानंतर गर्दी ओसरली

0
604

पुणे, दि.४ (पीसीबी) शहरातील कटेन्मेंट भाग वगळता वाईन्स शॉप सुरू होणार असल्याच्या आशेने मद्यपीनी विश्रांतवाडी-लोहगाव परिसरातील वाईन्स शॉप समोर सकाळ पासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. पिंपरी चिंचवड शरातसुद्धा तेच चित्र आहे. आकुर्डी, इंद्रायणी नगर येथे मोठी रांग आहे, दुकाने बंद आहेत. सकाळी अकरा वाजले तरी दुकाने सुरू झाली नव्हती तरी देखील मद्यपी रांगा लावून थांबले होते. वाईन्स शॉप वाल्याना दुकाने उघडण्याबाबत कोणतेही आदेश नसल्यामुळे दुकाने बंदच होती. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी अखेर पोलीस बोलविण्यात आले. पोलिसांनी दडुका उगारल्यानंतर सर्वांनी पळ काढला.

लोहगावतील साठे वस्ती, पोरवाल रोड भागातील रोलेक्स वाईन्स शॉप सुरू होणार म्हणून मद्यपी सकाळी आठ वाजलेपासून दुकानासमोर रांगा लावून थांबले होते. हळूहळू गर्दी वाढतच गेली. मात्र साडेदहा वाजले तरी दुकान काही सुरू झाले नसल्याने मद्यपीनी शटर वाजण्यास सुरवात केली. दुकान मालकाला हे समजल्यानंतर दुकान मालक आले. त्यानी दुकान उघडणार नसल्याचे सांगितले. मात्र तरी देखील गर्दी काही कमी होत नव्हती. दुकान मालकाच्या सांगण्यावरून सुमारे दोन हजार नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने अखेर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. लोहगाव चौकीचे पोलीस आले. त्यांनी काठी उगाल्यानंतर मद्यपीनी पळ काढला.

वाईन्स शॉप मालक अभिजित नवले म्हणाले, आपल्याला दुकान उघडणेबाबत काही सूचना आद्यप आल्या नाहीत. दुकाने आज पासून सुरू होणार असे बातमी मध्ये सांगितल्या मुळे नागरिकांनी सकाळ पासून रांगा लावल्या होत्या. सुमारे दोन हजार नागरिक जमले होते. शटर खोलण्याचा प्रयत्न झाले मुळे अखेर मला पोलिसांना बोलवावे लागले. जोपर्यंत आदेश येत नाहीत तोपर्यंत आपण दुकान उघडणार नसल्याचे नवले यांनी सांगितले.