लॉकडाउन वाढायला सुरुवात; केंद्राकडे केले अपील

0
595

 

लॉकडाउन वाढायला सुरुवात

देश, दि.९(पीसीबी) कोरोना वायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन संपूर्ण  भारतात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. परंतु लॉकडाउन केल्यानंतरही कोरोना वायरसचा प्रकोप थांबण्याचे नाव घेत नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत वाढवला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. असे करणारे ओडिशा हे देशातले पहिले राज्य आहे. ओडिशा मध्ये स्कूल-कॉलेज १७ जून पर्यंत बंद असणार आहेत.

*केंद्राकडे केले अपील *

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केंद्र सरकारला ३० एप्रिल पर्यंत ट्रेन व विमान सेवा सुरु न करण्याचे अपील केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्ग ची साखळी तोडण्यासाठी देशभरात २१ दिवसांच्या लाॅकडाउनची घोषणा केली होती. मंत्रीसमंडळाच्या बैठकीत ही मुदत देशभर वाढविण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.