लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पत्नीवर चाकूने वार; पतीवर गुन्हा दाखल

0
225

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने वार करून जखमी केले. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 2) रात्री साखरे वस्ती येथे घडली.

महादेव दिलीप गायकवाड (रा. साखरेवस्ती, हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पत्नी सपना महादेव गायकवाड (वय 30) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव आणि फिर्यादी सपना हे पती-पत्नी आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी महादेव याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी पतीला शिवीगाळ करू नका, असे म्हटले. या कारणावरून चिडलेल्या पतीने फिर्यादी यांच्या पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने मानेवर वार करून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.