लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

0
202

चिखली, दि. ४ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने महिलेवर बलात्कार केला. ही घटना मार्च 2015 ते 24 जून 2021 या कालावधीत चिखली येथे घडली.

कृष्णाथ नागनाथ पुरी (वय 27, रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 3) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. फिर्यादी महिलेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन, तिचा विश्वास संपादन करून, फसवणूक करून आरोपीच्या राहत्या घरी बोलावून वारंवार बलात्कार केला. तसेच आरोपीने संशयाच्या कारणावरून फिर्यादी महिलेला हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.