लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एकास अटक

0
350

दिघी, दि. ३ (पीसीबी) – किराणा माल आणि तेल घेऊन तो माल अज्ञातांना विकून त्या पैशांचा अपहार केला. याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना 15 ते 31 ऑगस्ट या कालावधीत गायकवाड नगर, चौधरी पार्क दिघी येथे घडली.

प्रकाश तुळशीराम देवडा (वय 33, रा. गायकवाडनगर, चौधरी पार्क, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत योगेश राजेंद्र चोरडिया (वय 41, रा. कासारवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि इतर लोकांकडून 67 लाख 16 हजार 451 रुपये किमतीचा किराणा माल आणि तेल घेऊन तो माल कोणासतरी विकला. त्याचे पैसे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादी यांच्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करून फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.