लाईव्ह सुनावणी इथे पाहा…

0
149

– webcast.gov,in/scindia/ लिंकवर जाऊन ही सुनवाणी पाहता येईल, ऐकता येईल

नवी दिल्ली, दि. २७ (पीसीबी) – शिवसेनेतील अंतर्गत वाद आणि महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहेच. पण संपूर्ण देशासाठीही आज ऐतिहासिक दिवस आहे. कारण आजपासून सुप्रीम कोर्टातील कामकाज संपूर्ण देशातील जनतेला लाइव्ह पाहता येणार आहे. आज मंगळवारी 27 सप्टेंबरपासून सुप्रीम कोर्टातील घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी जनतेला लाइव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे आज कोर्टात कोण-कोणते खटले चालणार, हेही महत्त्वाचे आहे. webcast.gov,in/scindia/ लिंकवर जाऊन ही सुनवाणी पाहता येईल, ऐकता येईल.

कोर्टात आज EWS आरक्षण, महाराष्ट्रातील शिवसेना वाद, दिल्ली-केंद्र सरकार वाद यासारखे खटले पटलावर सुनावणीसाठी घेतले जातील.
सध्या या लाईव्ह सुनावणीवरून काही गाईडलाइन्स देण्यात आलेल्या नाहीत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त या लिंकवर लाइव्ह सुनावणी पाहता येईल.

विशेष म्हणजे एकदा लाइव्ह सुनावणी झाल्यानंतर या खटल्यांचं पुनर्प्रक्षेपण होणार नाही. कारण सध्या ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे.
कोरोना संकटानंतर देशभरात ऑनलाइनची व्यवस्था किती उपयुक्त आहे, याचा अनुभव सर्वांनीच घेतला. या काळात सुप्रीम कोर्टानंही नवी परंपरा सुरु केली.
सुप्रीम कोर्टानेही देशभरातून ई फायलिंग द्वारे याचिका दाखल करण्यास सुरुवात केली होती. जनतेसाठी हा निर्णय खूप फायद्याचा ठरला.

विशेष म्हणजे ई फायलिंगचं काम २४ तास सुरु असतं. दिवसभरात आपण कधीही याचिका दाखल करू शकतो.
सुप्रीम कोर्टाने कोर्टाचे शुल्क भरण्याची व्यवस्थाही ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. या प्रणालीत डिजिटल स्वाक्षरीचा वापर केला जाऊ शकतो. कोरोना काळात देशभरातील कामकाज ठप्प झालं होतं. तेव्हा बहुतांश कोर्टाचं काम ऑनलाइन झालं होतं.
ऑनलाइन सुनावणीची सुरुवात तेव्हाच झाली होती. आज ही सामान्य स्थितीतही लागू होणार आहे.