लाईट समस्याबाबत महावितरण अधिकाऱ्या बरोबर चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मिटिंग

0
299

पिंपरी, दि. 19 (पीसीबी): स्वराज सहकारी गृहनिर्माण संस्था मोशी येथे आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मिटिंग झाली.
मागील बऱ्याच दिवसापासून चिखली,मोशी,चऱ्होली, डुडुळगाव परिसरातील लाईट सतत जाते येते. त्यामुळे सोसायट्यांच्यामधील सदस्यांना त्रास होतो. अनेक सदस्य सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यांना तसेच 10 वी, 12 वीचे विध्यार्थी यांना खूप त्रास होतो अशा तक्रारी उपस्थित सर्व सदस्यांनी मांडल्या.
महावितरण कडून जर हे असेच चालत राहिले तर लोकांच्या नोकऱ्यावर गदा येईल. लाईट गेल्यावर ती दिवसभर येत नाही. त्यामुळे सोसायट्यांच्या जनरेटरवर (DG वर) लागणाऱ्या डिझेलचा लाखो रुपये खर्च कोण देणार हा प्रश्न आहे. जर महावितरण कडून हे सर्व थांबले नाही तर महावितरण विरुद्ध मोठे आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिला.

सततच्या व जास्त वेळ जाणाऱ्या लाईटमुळे महिला वर्गास खूप त्रास होतो. आता महिलांची सहनशीलता संपत चालली आहे. त्यामुळे महावितरणने लवकर यावर तोडगा काढावा अन्यथा सोसायट्यांच्यामधील महिलांचा उद्रेक होऊ शकतो, अशा भावना निलमताई हुले यांनी मांडल्या.
स्वराज सोसायटीमध्ये परवा रात्रभर व दिवसभर लाईट नव्हती. हे सतत 15 दिवसातून असेच होते. हा प्रश्न लवकर सोडवण्याची विनंती फेडरेशनचे सदस्य व स्वराज सोसायटीमधील रहिवासी बलाप्पा माने यांनी केली.
सभेस महावितरणचे मोशी विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.वरुडे साहेब उपस्थित होते. त्यांनी स्वराजचा विषय व ही समस्या महावितरणची नाही, यात महावितरणची काहीही चूक नाही. स्वराज सोसायटीचे बिल्डर यांनी स्वराजसाठी वेगळे असणारे सबस्टेशन मागील पाच वर्षांपासून चालुच केलेले नाही. रिव्हर सोसायटीमधून स्वराजसाठी ज्या केबल टाकलेल्या आहेत, त्यापैकी एक केबल चार्जच केलेली नाही. त्यामुळे स्वराजसाठी सतत लाईट जाण्याची समस्या निर्माण होते. बिल्डरनी स्वराजसाठी वेगळे असणारे सबस्टेशनचे बाकी राहिलेले काम बिल्डरनी लवकर केले तर स्वराज सोसायटीचा प्रश्न सुटेल, असे श्री वरुडे यांनी म्हटले. चिखली,मोशी,चऱ्होली व डुडुळगाव परिसरसतील लाईट आता सतत जाणार नाही याची पूर्ण दक्षता महावितरण घेईल, असे वरुडे म्हटले.
फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांना साधून स्वराज सोसायटीचा विषय सांगीतल्यावर आमदार लांडगे म्हटले, ते स्वराज सोसायटीच्या बिल्डरसी बोलुन पुढील 20 दिवसात स्वराज सोसायटीसाठीचे वेगळे सबस्टेशनचे काम करून देण्याचे सांगतो व हे काम करून घेतले जाईल, आश्वासन दिले.
फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे, स्वराज सोसायटीचे चेअरमन श्री मस्के , कोअरकमिटी सदस्य उडाने, स्वराजच्या कोअर कमिटी सदस्या व भाजपाच्या नेत्या निलमताई हुले, फेडरेशनचे इतर पदाधिकारी व स्वराज सोसायटीचे सदस्य, ऋषभ खरात, महावितरण मोशी उपविभागाचे कनिष्ठ अभियंता श्री वरुडे हे उपस्थित होते.