“शहाण्याला शब्दाचा मार असतो. मात्र इथे…” शरद पवारांचा अमित शाहांच्या वक्तव्यावरुन राज्यपालांना टोला

0
347

तुळजापूर,दि.१९(पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री वादावर टोला देत प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे कि,”केंद्रीय गृहमंत्र्यांनीच राज्यपालांनी वापरलेली भाषा ही योग्य नाहिये. त्यामुळेच आत्मसन्मान असणारी व्यक्ती यानंतर त्या पदावर राहणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री वादावर टोला देत प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे. तुळजापूरमधील गव्हर्न्मेंट सर्किट हाउस येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी आपलं मत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी पवारांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेचा दाखला देत राज्यपालांना टोला लगावला.

शरद पवार पुढे असंही म्हणाले कि, केंद्रीय गृहमंत्र्यांनीच राज्यपालांनी वापरलेली ती भाषा पदाची प्रतिष्ठा वाढवणारी नक्कीच नसल्याचे मत व्यक्त केलं आहे. आतापर्यंत आपण कोणत्याही राज्यपालांनी असं वक्तव्य केल्याचं पाहिलं नसल्याचं म्हटलं. “१९५७ सालापासून चे सर्व राज्यपाल मी पाहिलेत. त्यानंतर १९६७ पासूनच्या सर्व राज्यपालांशी माझा थेट संबंध आला पण कोणी असं वक्तव्य केलं नाही,” असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनीच कानउघाडणी केल्यानंतर या पदावर राहयचं की नाही हा विचार करावा, असंही पवार यांनी राज्यपालांचे नाव न घेता म्हटलं आहे.

यावेळी पत्रकारांनी पवारांना राज्याच्या राज्यपालांनी पदावर रहावे की नाही? याबद्दल तुमचे काय मत आहे असा प्रश्न विचारला तेव्हा “हे सांगणारा मी कोण?,” असा प्रतिप्रश्न पवारांनी यावर उत्तर देताना विचारला. मात्र पुढे त्यांनी, “सेल्फ रिस्पेक्ट असणारा माणूस पदावर राहणार नाही,” असं म्हटलं. राज्यपाल, मुख्यमंत्री ही सर्व घटनात्मक पद असून त्याचा मान राखला गेला पाहिजे. राज्यपालांच्या पदाचा मान राखला गेला पाहिजे तसा मुख्यमंत्री पदाचाही मान राखला गेला पाहिजे. मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राज्यपालांकडून ठेवली जात नसेल तर हे चिंता वाढवणारं असल्याचंही पवार यांनी यावेळी नमूद केलं.

पुन्हा राज्यपालांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता पवारांनी खास त्यांच्या शैलीत नाव न घेता राज्यपालांना टोला लगावला. आपल्याकडे एक म्हण आहे पण ती इथे लागू होईल की नाही सांगता येणार नाही. ती म्हण, शहाण्याला शब्दाचा मार अशी आहे. मात्र यातील हा शब्द इथे योग्य आहे की नाही सांगता येणार नाही, असं पवार यांनी म्हटलं.