लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणे बलात्कारच – सुप्रिम कोर्ट

0
572

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणे हा देखील बलात्कारच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

महिलेशी खोटे बोलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे हे महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे आणि तिच्या मनावर आघात करणारे आहे, असे मत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने व्यक्त केलए. याशिवाय सध्या पुढारलेल्या समाजात अशा घटना वाढत असल्याचेही खंडपीठाने नमूद केले आहे.

छत्तीसगढमधील एका डॉक्टरविरोधात पीडीत महिलेने याचिका दाखल केली होती. पीडीत महिला आणि डॉक्टर एकमेकांना २००९ सालापासून ओळखत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. डॉक्टरने लग्नाचे आश्वासनही दिले होते. डॉक्टर आणि याचिकाकर्ती महिलेच्या प्रेमसंबंधाविषयी दोन्ही कुटुंबियांना पूर्ण कल्पना होती. आरोपी डॉक्टरने महिलेच्या कुटुंबियांसमोरच लग्नाचे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर आरोपीने दुसऱ्याच महिलेसोबत लग्न केले. पीडीत महिलेने डॉक्टरविरोधात कोर्टात धाव घेतली होती.