राहुल लोणीकर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तर, पिंपरी चिंचवडचे अनुप मोरे सरचिटणीसपदी

0
358

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष पदी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मुलाची म्हणजेच राहुल लोणीकर यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यात येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या अनुषंगाने भाजपातील फेरबदल महत्त्वाचे मानले जात आहेत. राहुल लोणीकर हे युवा मोर्चाचे सरचिटणीस होते. त्यानंतर आज भाजपा युवा मोर्चाच्या मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी पिंपरी चिंचवडचे युवा कार्यकर्ते अनुप मोरे यांना संधी देण्यात आली आहे. अनुप मोरे हे माथाडी मंडळाचे माजी सदस्य तसेच भाजपाच्या युवा वॉरियर्सचे अग्रणी कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटली यांच्या उपस्थितीत राहुल लोणीकर यांची युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षची आज निवड करण्यात आली.

भाजपच्या अनेक विद्यमान नेत्यांनी या पदावर काम करून पुढे राज्यात आपला ठसा उमटवला. विक्रांत पाटील, योगेश टिळेकर यांच्यासह पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर अशा तरुण नेत्यांनी गेल्या दशकात या पदावर काम केलं आहे. त्या आधी गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे या नेत्यांनीही युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात आपला ठसा उमटविला होता.