राहुल गांधी म्हणतात माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम पण…

0
518

पुणे, दि. ५ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपलं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम असल्याचं म्हटलं आहे. पण याचवेळी त्यांनी एक खंतही व्यक्त केली आहे. माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे, माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही, पण त्यांचा माझ्यावर राग आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींचं नाव घेताच यावेळी हॉलमध्ये मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी यांनी पुण्यात हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. सुबोध भावे यांनी जेव्हा संवाद साधण्यास खूप हिंमत लागते असं विचारलं असता राहुल गांधींनी सांगितलं की, ‘अनुभवातून हिंमत आली. जे सत्य आहे ते स्विकारलं. सत्यातून हिंमत येते. जर खोटं स्विकारलं तर भीती निर्माण होते. सत्य कधी कडवं असतं पण ते स्विकारावं लागतं’. पुढे बोलताना जर एखादी गोष्ट कऱण्याचा निर्णय मी घेतला तर त्याचे काही परिणाम असले तरी मी ते पूर्ण करतो असं सांगितलं.