राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळचे माजी तालुका संघचालक विनोद मेहता यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0
518

 

मावळ, दि.२७ (पीसीबी) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळचे माजी तालुका संघचालक विनोद रमणलाल मेहता (वय ५८) यांचे आज (सोमवारी) दुपारी चारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

विनोद मेहता यांच्या पार्थिवावर संध्याकाळी बनेश्वर स्मशानभूमीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने कोणीही अंत्यदर्शनासाठी अथवा अंत्यसंस्कारासाठी गर्दी करू नये, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.