पाकिस्तानी क्रिकेटपटु उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगचे प्रकरण भोवले

0
356

प्रतिनिधी,दि.२७ (पीसीबी) : पाकिस्तानचा आघाडीचा फलंदाज उमर अकमलला कोणत्याही खेळापासून तीन वर्षांची बंदी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने घातली आहे. मॅच फिक्सिंग व भ्रष्टाचाराचा आरोप प्रकरणी उमर अकमलला पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या अनुशासनात्मक पैनलचे जस्टिस (सेवानिवृत्त) फजल-ए-मीरान चौहान यांनी तीन वर्षांच्या बैनची शिक्षा सुवावली.

एका मुलाखती दरम्यान बोलताना उमर अकमलने असे सांगितले होते की, एका मॅच मध्ये विकेट किपींग करताना दोन चेंडू सोडण्यासाठी त्याला दोन लाख डॅालरची ॲाफर फिकसर्सने दिली होती. तसेच भारताविरुद्ध सामन्यांत न खेळण्यासाठी देखील त्याला पैश्यांची ॲाफर देण्यात आली होती. ॲास्ट्रेलिया व न्यूझीलॅण्ड मध्ये सन २०१५ साली खेळल्या गेलेल्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धे दरम्यान सुद्धा त्याला मॅच फिकसर्स भेटल्याचे उमरने सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउनसीलच्या(आयसीसी) नियमांनुसार मॅच फिक्सिंग किंवा कसल्याही भ्रष्टाचाराची माहिती आयसीसीला कळविणे खेळाडूंवर बंधनकारक आहे. परंतु उमर अकमलने मुलाखतीत सांगितलेली माहिती आयसीसीपासून लपवल्याचे सिद्ध झाले. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमावलील नियम २.४.४ व २.४.५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी अकमलला दोषी ठरविण्यात आल्याने त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.

उमर अकमल ने पाकिस्तानच्या वतीने १६ टेस्ट मैच, १२१ वन-डे आणि ८४ टी-२० अंतरराष्ट्रीय मैच खेळले आहेत. टेस्ट मध्ये १००३, वन-डे मध्ये १९४ आणि टी-२० मध्ये १६९० रन बनविले आहेत.