राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित शिबिरात १२७ जणांचे रक्तदान: पक्षाचे कार्यकर्ते, नगारिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
218

पिंपरी, दि.१०(पीसीबी) : कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना रक्तसाठ्याची कमतरता भरून काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. 9 एप्रिल 2021) आयोजित रक्तदान शिबिरात १२७ जणांनी रक्तदान केले. पक्षाचे कार्यकर्ते, नागरिकांचा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षाच्या वतीने राज्यभर रक्तदान शिबीरे घेऊन रक्तसंचय वाढविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या प्रमाणे पिंपरी वाघेरे येथील काशिबा शिंदे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर वैशाली घोडेकर, नगरसेविका उषा वाघेरे-पाटील, निकीता कदम, माजी नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, खजिनदार संजय लंके, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सामजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगाताई धेंडे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, महिला संघटक कविता खराडे, सविता खराडे, शक्रुल्ला पठाण, दीपक साकोरे, अमोल भोईटे, बाळासाहेब पिल्लेवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झाले.

रक्तदान शिबिराला पक्षाचे कार्यकर्ते, नगारिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १२७ जणांनी रक्तदान केले. तर, कमी वेळेत नियोजन करूनही सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच, पक्षाच्या आदेशानुसार कारोना संकट काळात मदतीसाठी धावून येण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. यासाठी संजोग वाघेरे पाटील यांनी सर्व रक्तदाते व कार्यकर्त्यांचे आभार मानले.