पिंपरी-चिंचवडच्या ‘या’ भागात मोठा छापा; रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
221

सांगवी, दि.१० (पीसीबी) : राज्यात कोरोनाने थैमान घातलं असून कोरोनावरती परिणामकारक लसींचा तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर या कोरोनावर परिणामकारक कोरोना इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आज सांगवीत हि मोठी कारवाई केली. या कारवाईत आरोपींकडून इंजेक्शनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काल अशीच घटना मुंबई मध्ये घडली. या इंजेक्शनचा साठा करून ठेवला जात असलेल्या मेडिकलवरती मुंबई पोलिसांनी छापा टाकून १०० हुन अधिक इंजेक्शन जप्त केली. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा घेऊन काही लोक इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, काळ्या बाजारात एका इंजेक्शनसाठी दहा ते पंचवीस हजार रुपये मोजावे लागत आहेत.