राष्ट्रवादी काँग्रेसच देशातील अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकेल – गफ्फार मलिक

0
593

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच देशातील अल्पसंख्याक समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आला आहे व भविष्यात देखील न्याय मिळवून देईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले. आकुर्डीतील ब्रम्हा हॉटेल येथे गुरूवार (दि. ४) अल्पसंख्याक समाजाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाऊसाहेब भोईर, सोहेल खान, शमीम पठाण, विठ्ठल (नाना) काटे, जगदीश शेट्टी, फजल शेख, महंम्मद पानसरे, प्रसाद शेट्टी, जावेद शेख, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, अरूण बोऱ्हाडे, विशाल वाकडकर, सुनिल गव्हाणे, वर्षा जगताप, कविता खराडे, विश्रांती पाडाळे, विनोद कांबळे, दिपक साकोरे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, मौलाना अब्दुल गफ्फार, लालमोहम्मंद चौधरी, इम्रान शेख, पांडुरंग लांखडे, प्रदिप गायकवाड, शक्रुल्ला पठाण, अशोक कुंभार, सुलेमान शेख, महेश झपके, प्रविण गव्हाणे, उत्तम हिरवे, रशिद सय्यद, दत्तात्रय जगताप, मेघा पवार, यतिन पारेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, अल्पसंख्याक समाज हा शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला समाज असल्याने या समाजाकडे देशातील काही पक्षाचे नेते हे केवळ व्होट बँक म्हणून बघण्यात येते. निवडणूकीत विविध अमिषे दाखवून मते पदरात पाडून घेतात व सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडतो. परंतु राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार हे नेहमीच अल्पसंख्याक (मुस्लिम) समाजाच्या बाजूने बारीक विचार करून, त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरबारी पुढाकार घेत आले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये देखील या समाजाला सामावून घेत आहे, तसेच समाजातील तरूण-तरूणी या शिक्षणात, उद्योगधंद्यात, नोकरीत कसे पुढे जाईल यांचा विचार व अमंलबाजवणीसाठी पक्ष नेहमीच आग्रही भूमिका घेत आहे, असे मलिक यांनी सांगितले.