दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा राज्यमंत्री शिवतारे यांनी केला पाठलाग

0
440

पुणे, दि. ५ (पीसीबी) –  पुणे-सासवड रस्त्यावर भिवरी गावाजवळ एका मोटार सायकलला धडक देवून पळून जाणाऱ्या होंडा क्रेटा कारचा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पाठलग करून कारमधील दोघांना पकडले. त्यातील एकजण पोलिस असल्याचे सांगितले जात आहे.

शिवतारे हे आज ( शुक्रवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास सासवडहून  पुण्याकडे निघाले होते. बापदेव घाटाच्या अलीकडे भिवरी  गावाजवळ शिवतारे यांच्या गाड्यांचा ताफा येत  होता. त्यावेळी विरुद्ध बाजूने येणाऱ्या होंडा क्रेटा कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यामुळे या दुचाकीवरील दोघेहीजण खाली पडले. दरम्यान, कारचालकाने  न थांबता तेथून सुसाट धूम ठोकली.

हे शिवतारे  यांनी  बघतिल्यानंतर  त्यांनी आपली गाडीतून त्या कारचा पाठलाग केला.  काही अंतरावर धडक देणाऱ्या कारला थांबविण्यात आले. त्यात दोघेजण होते. त्यातील एकाकडे पोलिसांचे ओळखपत्र सापडले. दोघेही दारू पिलेल्याचा संशय शिवतारे यांनी व्यक्त करून याची सासवड पोलिसांना माहिती देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी  करण्यास सांगितले.