राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार यांचा शुक्रवारी भाजप प्रवेश

0
958

नाशिक, दि. २१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा भारती पवार शुक्रवारी (दि.२२)  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.  दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे भारती पवार  राष्ट्रवादीवर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

भाजपमध्ये प्रवेश करून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून त्या लढण्यास इच्छुक आहेत. सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह आता उत्तर महाराष्ट्रातील   भारती पवार  आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भारती पवार या २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या धनराज महालेंना उमेदवारी दिली आहे.