लोकसभा लढवण्याबाबत सलमान खानने केला मोठा खुलासा

0
677

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – अभिनेता सलमान खान यांने लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण सलमानने ट्विटरवरुन दिले आहे.  त्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजनांविरोधात सलमान निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना  पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेसच्या तिकीटावर सलमान इंदूरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठव्यांदा खासदार आहेत. त्यामुळे सुमित्रा महाजन यांच्याविरोधात सलमान मैदानात उतरणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, सलमान खानने केलेल्या स्पष्टीकरणामुळे  या चर्चावर पडदा पडला आहे.

‘मी निवडणूक लढवणार असल्याच्या अफवा ऐकायला मिळाल्या, मात्र त्यात तथ्य नाही. त्याचप्रमाणे मी कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचारही करणार नाही’ असे सलमानने ट्विटरवर  म्हटले  आहे.  दरम्यान, नुकतीच सलमान खानची  मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाली आहे.