राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ

0
416

मुंबई, दि.३० (पीसीबी) –  महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळचा शपथविधी सोहळा विधानभवनाच्या प्रांगणात पार पडला. मंत्रिमंडळातील ३६ जणांच्या मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महाविकासआघाडीच्या ३६ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

"मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो…" ही शपथ घेताना परळीच्या मातीचे, स्व. अण्णांचे, आप्पांचे (लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब) स्मरण केले. माझ्या आईच्या डोळ्यात अभिमान पाहिला. परळीतील लहानांपासून थोरामोठ्यांचे चेहरे नजरे समोर भिरभिरत होते. आज कृतकृत्य झालो. तुम्ही दिलेल्या जबाबदारीची, विश्वासाची मला पूर्ण जाणीव आहे. इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नव्हता. पण या मार्गावर चालताना मला तुमची भक्कम साथ होती यापुढेही राहिल याचा विश्वास आहे. स्व. पंडित अण्णा, स्व. मुंडे साहेबांची आज खरोखरंच उणीव भासत आहे. आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, मला राजकारणात पाय रोवण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या परळीकरांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं. आज त्यांच्याचमुळे मला पूर्ण राज्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळते आहे. या प्रेमाची परतफेड विकासाने करणार ही मनोमन शपथ घेतली.#महाविकास_आघाडी #MahaVikasAaghadi #मंत्रिमंडळ_विस्तार Nationalist Congress Party – NCP ShivSena Indian National Congress Sharad Pawar #Parali

Gepostet von Dhananjay Munde am Montag, 30. Dezember 2019