राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आमदार के.सी. पाडवी यांच्यावर चांगलेच चिडले

0
473

मुंबई, दि.३० (पीसीबी) – काँग्रेस आमदार के.सी. पाडवी यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा त्यांनी शपथविधीचा शिरस्ता मोडून शपथविधीचा मजकूर सोडून त्यांनी लिहून आणलेला मजकूरही वाचून दाखवला. ज्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पाडवी यांच्यावर चांगलेच चिडले आणि त्यांना शपथ पुन्हा घ्यायला लावली.

येथे मी निसर्गासमोर नतमस्तक होतो, माझ्या मतदारांचे मी आभार मानतो. ज्यांनी मला निवडून दिले त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. मी माझ्या मतदारांचा ऋणी आहे ही काही वाक्यं पाडवी यांनी लिहून आणली होती. ती शपथ पूर्ण झाल्यावर त्यांनी वाचून दाखवली. ज्यावर राज्यपाल कोश्यारी चांगलेच चिडले. शपथ घ्यायची ही पद्धत नसते. जेवढं लिहून दिलं आहे तेवढंच वाचा. तुम्हाला शपथ कशी घ्यायची ते ठाऊक नसेल तर समोर शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे बसले आहेत त्यांना विचारा असंही राज्यपालांनी पाडवी यांना सुनावले.