राष्ट्रवादीला लोकच धडा शिकवतील – प्रकाश आंबेडकर

0
854

अहमदनगर, दि. ३१ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस  हा पक्ष शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी चालवतात. या मतावर मी अजूनही ठाम आहे. या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुरोगामी आहेत, मात्र त्यांचा पक्ष प्रतिगामी आहे,  राष्ट्रवादीला लोक धडा शिकवतील, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते व  भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (गुरूवार) येथे लगावला.

शिर्डीत पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आमची आघाडी काँग्रेससोबत आहे. काँग्रेसने कोणासोबत जायचे हा त्यांचा प्रश्न आहे.  कोणत्या १२ जागा आम्हाला द्यायच्या हे काँग्रेसने ठरवायचे आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी जागावाटपाचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टोलवला.

बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांसाठी काम केले आहे. मात्र, काही जणांनी बाबासाहेबांच्या या विचारालाच हरताळ फासला आहे. वंचित बहुजन आघाडीत जातीय नेत्यांना कोणतीही जागा नाही,  अशी टीका त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता केली.