राष्ट्रवादीत गटबाजी? अजित पवार, जितेंद्र आव्हाड शिवस्वराज्य यात्रेपासून दूर

0
885

पुणे, दि. ६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून (मंगळवार) शिवनेरी किल्ल्यावरुन सुरु झाली. मात्र, राष्ट्रवादीच्या या शिवस्वराज्य यात्रेत गटबाजीचे राजकारण दिसून आले. कारण या यात्रेत अजित पवार, जितेंद्र आव्हाड या प्रमुख नेत्यांना दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. या यात्रेच्या नियोजनाबाबत अनेक नेत्यांना विश्वासातही घेतले नसल्याचे समोर येत आहे.

भाजप आणि शिवसेनेने यात्रा काढली आहे. या यात्रेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा सुरु केली. मात्र राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना शिवस्वराज्य यात्रेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर आशीर्वाद घेऊन डॉ. अमोल कोल्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते  धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, या यात्रेतून खासदार अमोल कोल्हे सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या कारभार कसा हल्ला चढवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.