काश्मीर खोऱ्यात स्थिती सुरळीत आहे – अजित डोवाल

0
421

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – राज्‍यसभेत जम्‍मू काश्‍मीरचे कलम ३७० रद्द करण्याचे विधेयक पारित झाल्यानंतर राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) काश्‍मीरच्या खोऱ्यात गेले आहेत. डोवाल यांनी खोऱ्यातल्या सुरक्षा व्यवस्थेचा अढावा घेऊन गृहमंत्री अमित शहा यांना ‘संदेश’ पाठवला – खोऱ्यात स्थिती सुरळीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित डोवाल यांनी खोऱ्यात जाऊन तिथल्या स्थितीचा आढावा घेतला. अमित शहा यांना पाठवलेल्या अहवालात डोवाल यांनी म्हटले आहे की – काश्मिरी नागरीक सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. खोऱ्यात सर्व ठिकाणी वातावरण शांत आहे. कुठेही विरोध – निदर्शने झाली नाही. सर्व स्थिती सुरळीत आहे. नागरिक महत्त्वाच्या कामांसाठी घरातून बाहेर पडत आहेत.