राष्ट्रवादीची गळती कायम; ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश

0
440

सातारा, दि. ८ (पीसीबी)  – माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते   शेखर गोरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.    

फलटणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोर शेखर गोरे यांनी गोंधळ घातला होता. यामुळे गोरे चांगलेच चर्चेत आले होते.  पक्षातील अंतर्गत वादामुळे  शेखर गोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान  गोरे यांनी आपले बंधू जयकुमार गोरे यांच्या  भावाच्या विरोधात जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेकडे बहुमत असताना देखील गोरे यांना पराभव पत्कारावा लागला होता.