राष्ट्रवादाला मारक भूमिका घेणाऱ्या हिंदूंच्या रक्तात कमजोरी-संभाजी भिडे

0
466

सांगली ,दि.२४(पीसीबी) –: हिंदू समाजातील लोकांमध्ये पूर्वीपासूनच एक कमजोरी आहे. त्यांना आपले आणि परके कोण हा भेद कळत नाही. देश, देव आणि धर्म हे हिंदू लोकांच्या रक्तातच नसते. सध्याच्या घडीला हिंदू समाज राष्ट्रवादाला मारक भूमिका घेत आहे, अशी टीका श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी केली. ते मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी संभाजी भिडे यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन केले. हा कायदा देशहिताचा आहे. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होते. स्वातंत्र्याच्या नावाखाली या कायद्याला विरोध करणे योग्य नाही. हे अतिश्य घातक आहे. आतादेखील देशातील सुशिक्षित हिंदू लोकांनी या कायद्याविरोधात घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादाला मारक आहे, असे संभाजी भिडे यांनी सांगितले.