राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) बाबत केंद्रसरकारचा महत्वपूर्ण निर्णय

0
433

नवी दिल्ली ,दि.२४(पीसीबी) – : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. माहितीनुसार , यासाठी ८५०० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे.

एनपीआरची सुरवात पुढील वर्षी एप्रिलमध्ये होईल. हा पट नागरिकांच्या नेहमीच्या निवासाची नोंदणी असेल २०१५मध्ये दारोदार जाऊन केलेल्या सर्वेक्षणात सुधारणा केली. या सुधारीत माहितीचे डिजिटायजेशन केले होते. या माहितीमध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहे.२०२१ मधील जनगणनेच्या कामाची सुरवात एप्रिल ते सप्टेंबत २०२० मध्ये करण्यात येईल. ती आसाम वगळता सर्व राज्यात राबवण्यात येईल.

*काय आहे एनपीआर ?

– राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) च्या माध्यमातून सरकार देशातील प्रत्येक नागरिकाची माहिती ठेवू शकेल.

– त्याअंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाची बायोमेट्रिक नोंदी घेतली जातील आणि त्यांची वंशावळही नोंदविली जाईल.

– सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ राहणार्‍या रहिवाशासाठी एनपीआरकडे नोंदणी करणे बंधनकारक असेल.

– सरकार राष्ट्रीय पातळीवर , राज्यस्तरीय , जिल्हा , उपजिल्हा व स्थानिक पातळीवर एनपीआर यादी तयार करेल.

– एनपीआर प्रक्रिया तीन टप्प्यात तयार होईल – पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२०दरम्यान असेल. यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांकडून आवश्यक ते माहिती घरोघरी जाऊन गोळा केली जाईल.

– दुसरा टप्पा ९ फेब्रुवारी २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२१पर्यंत असेल. यानंतर तिसर्‍या टप्प्यानंतर संकलित डेटामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या जातील.