रावेत येथील रेल्वे ट्रॅकवर अज्ञाताच्या डोक्यात दगड घालून खून

0
668

देहुरोड, दि. २७ (पीसीबी) – डोक्यात दगड मारुन खून केल्याच्या अवस्थेत एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह धर्मराज चौक रावेत, रेल्वे ट्रकजवळ अढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवार (दि.२३) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी देहुरोड पोलिसांना माहिती मिळाली कि धर्मराज चौक रावेत येथील रेल्वेच्या ट्रॅकवर एक मृतदेह आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली असता एक ४५ वर्षीय पुरुषाच्या डोक्या दगड मारुन खुन झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे अधिक तपास करत आहेत.